घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2016  
 

   गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2016: 

आपल्या मराठे प्रतिष्ठानतर्फे सदस्यांसाठी तसेच चित्पावन कपिगोत्री ब्राह्मण असलेल्या ‘मराठे, खांबेटे, चक्रदेव, विद्वांस न तद्जन्य आडनावाच्या व्यक्तींसाठी ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केलेली आहे. आपल्या स्वतःच्या घरातील गणपतींसाठी केलेल्या सजावटीची कमाल दोन छायाचित्रे आपण प्रतिष्ठानकडे पाठवून आपण या स्पर्धेत भाग घेऊ शकता. याबाबतचे नियम व अटी पुढीलप्रमाणे: 

  • भाग घेण्यासाठी पात्रता: ‘मराठे परिवार’ या facebook group वरील सदस्य, मराठे प्रतिष्ठानचे/ हितगुजचे सदस्य, मराठ्यांच्या माहेरवाशिणींच्या कुटुंबातील सदस्य, इतर सर्व कपिगोत्री मराठे कुलबांधव.
  • प्रवेशिका कुठे/कशा पाठवाव्या: ‘मराठे परिवार’ या facebook group वर upload किंवा admin@ maratrhepratishthan.org या इमेल आयडी वर केवळ ‘.jpg’ format मधील कमाल 2 फाईलद्वारे.
  • प्रवेशिका पाठविण्याचा कालावधी: दि. 6 सप्टेंबर 2016 ते दि. 18 सप्टेंबर 2016.
  • प्रवेशिकेसोबत देण्याची माहिती.

A: मराठे आडनावाच्या व्यक्तींनी

1)   पूर्ण नाव:

2)   आजोबांचे नाव:

3)   वय,

4)   पूर्ण पत्ता,

5)   व्यवसाय,

6)   संपर्क क्र. (दूरध्वनी/भ्रमणध्वनी),

7)   इमेल आयडी (facebook वर upload केल्यास) 

B: माहेरवाशिणींच्या परिवारातील सदस्यांनी:

1)   पूर्ण नाव,

2)   आईचे पूर्ण नाव (प्रेषक माहेरवाशिणींचा मुलगा/मुलगी असल्यास) किंवा वडिलांचे पूर्ण नाव (प्रेषक माहेरवाशीण असल्यास)

3)   आईच्या वडिलांचे पूर्ण नाव (प्रेषक माहेरवाशिणींचा मुलगा/मुलगी असल्यास) किंवा आजोबांचे पूर्ण नाव (प्रेषक माहेरवाशीण असल्यास),

4)   वय,

5)   पूर्ण पत्ता,

6)   व्यवसाय,

7)   संपर्क क्र. (दूरध्वनी/भ्रमणध्वनी),

8)   इमेल आयडी (facebook वर upload केल्यास). 


  • छायाचित्राच्या caption मध्ये प्रेषकाचे नाव किंवा शहर यांचा उल्लेख नसावा. प्रवेशिका म्हणून पाठवलेली छायाचित्रे प्रेषकाच्या घरच्या गणपतीच्या सजावटीची असावीत, बिल्डींग/ सोसायटी किंवा आळीतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या गणपतीच्या सजावटीची नव्हेत. माहेरवाशिणी आपल्या माहेरच्या गणपतीच्या सजावटीची छायाचित्रे पाठवू शकतील.
  • प्राप्त झालेल्या प्रत्येक छायाचित्रास एक क्रमांक (आयडी) देण्यात येईल व तो प्रेषकाला कळवला जाईल. त्यासंबंधी असलेल्या विचारणा (enquiry)  त्या क्रमांकाचा दाखला देऊन कराव्या.
  • या स्पर्धेच्या बाबतीत अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल. त्यासंबंधी कोणत्याही प्रकारची तक्रार/ वादविवाद होऊ नयेत एवढीच माफक अपेक्षा आहे. 


या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना देण्यात येणारी पारितोषिके:


प्रथम पारितोषिक: रु.1001/-:

द्वितीय पारितोषिक: रु. 751/-:

तृतीय पारितोषिक: रु. 501/-:

 

20 पेक्षा जास्त प्रवेशिका आल्यास 2 उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येतील. 


टीप:

1.  मराठे प्रतिष्ठानच्या ‘कार्यकारिणी सदस्यांना’ या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. 

2.  पारितोषिक विजेत्यांची निवड, किमान त्रिसदस्यीय मंडळ करेल, ज्यात फोटोग्राफी/कला/ सजावट क्षेत्रातील जाणकार दोन/तीन सभासद सदस्य तसेच एक बाह्य परीक्षक असतील.  

3. या स्पर्धेसंदर्भात काही शंका किंवा सूचना असल्यास कार्यवाह श्री. हेमंत मराठे यांच्याशी संपर्क साधावा. ई-मेल: hemant.a.marathe@gmail.com,  भ्रमणध्वनी: 9220699957