दहावे अखिल भारतीय कुलसंमेलन, सांगली  
 

सांगलीच्या कुलबांधवांच्या आग्रहाच्या विनंतीनुसार ‘मराठे प्रतिष्ठानचे अखिल भारतीय संमेलन शनिवार दि. 23. व रविवार दि. 24 जानेवारी 2016 रोजी सांगली येथे योजण्यात आले आहे. या  संमेलनासाठी आपणा सर्वांना हार्दिक निमंत्रण.

2009 च्या पुणे येथे आयोजित अशा संमेलना नंतर तब्बल 6 वर्षांनी परस्पर संपर्कासाठी आलेल्या या संधीचा लाभ बहुसंख्य कुलबांधवांना मिळावा या हेतूने प्रशस्त अशी दोन सभागृहे असलेल्या सांगलीतील सुप्रसिद्ध ‘खरे मंगल कार्यालय’ येथे  हे संमेलन संपन्न होणार आहे. सुमारे 200 ते 300 च्या संख्येने उपस्थितीची अपेक्षा आहे त्यामुळे प्रत्येकी नाममात्र रु. 200/- शुल्क ठरवले आहे. या आवाहनास अनुसरून सर्व मराठे कुलबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे संमेलन यशस्वी करण्यास हातभार लावावा ही आग्रहाची विनंती. या संमेलनाबाबत पूर्ण माहितीचं पत्रक आपल्यापर्यंत एव्हाना पोहोचले असेलच. 

 

आपल्या सहभागाबाबत संकेतस्थळावरील 'Web Poll' द्वारे  किंवा पत्रात उल्लेख केलेल्या व्यक्तींशी संपर्क साधून माहिती लवकरात लवकर द्यावी ही विनंती. (Web Poll दि. 24 नोव्हेंबर पासून उपलब्ध होत आहे)

 

रमाकांत विद्वांस

कार्याध्यक्ष