गणेशोत्सव सजावट स्पर्धा  
 

 गणेशोत्सव सजावट स्पर्धा: 

आपल्या मराठे प्रतिष्ठानतर्फे ‘सदस्यांसाठी तसेच ‘चित्पावन कपिगोत्री ब्राह्मण असलेल्या ‘मराठे’ आडनावाच्या व्यक्तींसाठी ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केलेली आहे. आपल्या घरातील गणपतींसाठी केलेल्या सजावटीची कमाल दोन छायाचित्रे आपण प्रतिष्ठानकडे पाठवून आपण या स्पर्धेत भाग घेऊ शकता. याबाबतचे नियम व अटी पुढीलप्रमाणे: 
  • भाग घेण्यासाठी पात्रता: ‘मराठे परिवार’ या facebook group वरील सदस्य, मराठे प्रतिष्ठानचे/ हितगुजचे सदस्य, मराठ्यांच्या माहेरवाशिणींच्या कुटुंबातील सदस्य.
  • प्रवेशिका कुठे/कशा पाठवाव्या: ‘मराठे परिवार’ या facebook group वर upload किंवा admin@ maratrhepratishthan.org या इमेल आयडी वर केवळ ‘.jpg’ format मधील कमाल 2 फाईलद्वारे.
  • प्रवेशिका पाठविण्याचा कालावधी: दि. 17 सप्टेंबर 2015 ते दि. 27 सप्टेंबर 2015.
  • प्रवेशिकेसोबत देण्याची माहिती. 

 

A: मराठे आडनावाच्या व्यक्तींनी

1)   पूर्ण नाव,

2)   आजोबांचे नाव:

3)   वय,

4)   पूर्ण पत्ता,

5)   व्यवसाय,

6)   संपर्क क्र. (दूरध्वनी/भ्रमणध्वनी),

7)   इमेल आयडी (facebook वर upload केल्यास) 

B: माहेरवाशिणींच्या परिवारातील सदस्यांनी:

1)   पूर्ण नाव,

2)   आईचे पूर्ण नाव (प्रेषक माहेरवाशिणींचा मुलगा/मुलगी असल्यास) किंवा वडिलांचे पूर्ण नाव (प्रेषक माहेरवाशीण असल्यास)

3)   आईच्या वडिलांचे पूर्ण नाव (प्रेषक माहेरवाशिणींचा मुलगा/मुलगी असल्यास) किंवा आजोबांचे पूर्ण नाव (प्रेषक माहेरवाशीण असल्यास),

4)   वय,

5)   पूर्ण पत्ता,

6)   व्यवसाय,

7)   संपर्क क्र. (दूरध्वनी/भ्रमणध्वनी),

8)   इमेल आयडी (facebook वर upload केल्यास). 

  • छायाचित्राच्या caption मध्ये प्रेषकाचे नाव किंवा शहर यांचा उल्लेख नसावा. प्रवेशिका म्हणून पाठवलेली छायाचित्रे प्रेषकाच्या 
  • घराच्या गणपतीच्या सजावटीची असावीत, बिल्डींग/ सोसायटी किंवा आळीतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या गणपतीच्या सजावटीची नव्हेत. 
  • प्राप्त झालेल्या प्रत्येक छायाचित्रास एक क्रमांक (आयडी) देण्यात येईल व तो प्रेषकाला कळवला जाईल. त्यासंबंधी असलेल्या विचारणा (enquiry)  त्या क्रमांकाचा दाखला देऊन कराव्या.
  • या स्पर्धेच्या बाबतीत अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल. त्यासंबंधी कोणत्याही प्रकारची तक्रार/ वादविवाद होऊ नयेत एवढीच माफक अपेक्षा आहे. 
  •  
या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना देण्यात येणारी पारितोषिके:
 
प्रथम पारितोषिक : रु.1001/-: प्रायोजक: श्री. रमाकांत विद्वांस, मुंबई, (विश्वस्त आणि अध्यक्ष, मराठे प्रतिष्ठान)
द्वितीय पारितोषिक : रु. 751/-: प्रायोजक: श्री. आनंदराव मराठे, ठाणे, (विश्वस्त आणि माजी अध्यक्ष, मराठे प्रतिष्ठान)
तृतीय पारितोषिक : रु. 501/-: प्रायोजक: श्री. सुरेश गोविंद मराठे, डोंबिवली, (कार्यकारिणी सदस्य)  


टीप: 
  1. मराठे प्रतिष्ठानच्या ‘कार्यकारिणी सदस्यांना’ या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. 
  2. पारितोषिक विजेत्यांची निवड, किमान त्रिसदस्यीय मंडळ करेल, ज्यात फोटोग्राफी/कला/ सजावट क्षेत्रातील जाणकार दोन/तीन सभासद सदस्य तसेच एक बाह्य परीक्षक असतील.  
  3. या स्पर्धेसंदर्भात काही शंका किंवा सूचना असल्यास श्रीनिवास मराठे यांच्याशी संपर्क साधावा. ई-मेल: shriniwas_marathe@yahoo.com ,  भ्रमणध्वनी: 9833216468