‘उद्योजकता पुरस्कार प्रदान समारंभ’ आणि विभागीय मेळावा :  
 

 

निर्माण ग्रुप’च्या श्री. अजित मराठे यांनी पुरस्कृत केलेला ‘उद्योजकता पुरस्कार’ या वर्षी प्रतिष्ठानचे सभासद आणि ‘नवचैतन्य प्रकाशन’ या संस्थेच्या ‘सौ. सुप्रिया व श्री. शरद मराठे’ या दाम्पत्याला देण्यात येणार आहे. या निमित्त रविवार दि. 14 जून 2015 रोजी ‘श्रीकृष्ण नगर’ बोरीवली येथे एक हृद्य समारंभ आयोजित केला आहे. या निमित्ताने एक विभागीय मेळावाही घेण्यात येणार आहे. या दोन्ही समारंभासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान हा सोहळा संपन्न होईल. कार्यक्रम पत्रिका व समारंभस्थळाचा पूर्ण पत्ता पुढीलप्रमाणे:


समारंभ स्थळ: ‘संस्कार भवन सभागृह’, पोस्टऑफिसजवळ, श्रीकृष्ण नगर, बोरिवली पू. मुंबई 400066 

                        (नॅशनल पार्क गेट मधून डाव्या हाताच्या रस्त्याने येणे)

कार्यक्रम: स. 10 वा उपस्थितांची नावनोंदणी:

             उपस्थितांचे स्वागत.

             श्री. गणेश पूजन

             परस्पर परिचय,

             उद्योजकता पुरस्कार वितरण

             संध्या खांबेटे, श्रुती व आश्लेषा मराठे यांचे गायन.

             स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद.

           

सभासदांना तसेच कपि गोत्री ‘मराठे’ कुलबांधवांना आग्रहाचे निमंत्रण.

 

कृपया आपली उपस्थिती आगाऊ कळवल्यास (भ्रमणध्वनी: शैलेंद्र:9820404554, हेमंत: 9220699957,श्रीनिवास: 9833216468)समारंभ नेटका होण्यास मदत होईल.